मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज वाढदिवस. किंग खान आज 52 वर्षांचा होत आहे. शाहरुखच्या बर्थडेच्या आधीपासूनच त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर बर्थडे बाबतचे ट्रेण्ड केले होते. त्यावरुनच चाहते शाहरुखचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी किती उत्सुक आहेत, हे यावरुन दिसून येतं.

शाहरुखचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्र परिवाराने शाहरुखच्या अलिबागच्या फार्महाऊसची निवड केली आहे. तिथेच त्याचं बर्थडे सेलिब्रेशन होईल.

शाहरुख त्याची पत्नी गौरी खान, बहिण शहनाज, मुलगी सुहाना हे नुकतेच गेटवे ऑफ इंडियावर दिसले होते. तिथूनच ते अलिबागच्या फार्म हाऊसकडे रवाना झाले.

याशिवाय अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता, ऋतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान आणि शानया कपूर हे सुद्धा अलिबागला पोहोचले आहेत.

शाहरुखच्या बर्थडे निमित्त आज रात्री ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये करण जोहर, शाहरुख खान, गौरी खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ, फराह खान यांच्यासह शाहरुखचा जवळचा मित्रपरिवार हजर राहणार आहे.

संबंधित बातम्या

बाहुबलीच्या सीक्वेलमध्ये शाहरुख खान नाही, निर्मात्यांचे स्पष्टीकरण 


मी सलमानचा मित्र बनलोय, आता सोबतच सिनेमा रिलीज करू : शाहरुख खान