मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान पुन्हा एका वादात अडकण्याची शक्यता आहे. टर्कीमध्ये शाहरुख आणि चाहत्यामध्ये झालेली झटापट ट्विटरवर व्हायरल झाली आहे.
या व्हिडिओमध्ये सुरक्षारक्षकांनी घेरलेल्या शाहरुखनं चाहत्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. मात्र शाहरुखनं चाहत्यांना धक्काबुक्की केली की चाहत्यामुळे हा प्रकार झाला, हे व्हिडिओतून नेमकं स्पष्ट होत नाही. मात्र शाहरुख कमालीचा रागावलेला दिसतो.
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडल्यानंतर शाहरुख बाजूला जाऊन चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात पडला आहे.
2012 मध्ये 'आयपीएल'दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शाहरुखची सुरक्षारक्षकांशी झालेली झटापट मोठी वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर एसआरकेला वानखेडेवर प्रवेश करण्यास बंदी घातली होती.

पाहा व्हिडिओ :



आणखी एक व्हिडिओ :