मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला काल नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एका ड्रग प्रकरणात अटक केली आहे. त्याच्या घरातून अमली पदार्थ आणि कोकेन जप्त करण्यात आले. एनसीबी त्याची अधिक चौकशी करत आहे. अरमान कोहलीने 1992 मध्ये 'विरोधी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जवळपास एक दशकानंतर, त्याने 'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. यानंतर तो बिग बॉसच्या सातव्या पर्वात स्पर्धक म्हणूनही आला.


पण तुम्हाला माहीत आहे का, अरमान कोहलीला 1992 मध्ये आलेल्या 'दीवाना' चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने ती नाकारल्याने नंतर त्या सिनेमात नंतर शाहरुख खान दिसला होता. शाहरुखचा हा पहिलाच चित्रपट होता. शाहरुख खानने एका जुन्या मुलाखतीत म्हटले होते की, अरमान कोहलीने 'दीवाना' सिनेमा सोडल्यामुळे आज मी सुपरस्टार बनू शकलो. 


शाहरुख खानने एका मुलाखतीत म्हटले होते की, दीवाना चित्रपटाने चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. पण मला असे वाटत नाही की मी त्याच्या यशामध्ये कोणत्याही प्रकारे योगदान दिले आहे. माझा परफॉर्मन्स इतका चांगला नव्हता. माझा अभिनय या सिनेमात इतका चांगला नव्हता आणि मी त्याची संपूर्ण जबाबदारी घेतो, असं शाहरुखने म्हटलं होतं. 


मी माझा स्वतःचा समीक्षक आहे


शाहरुख खान पुढे म्हणाला होता की, मी माझा स्वतःचा सर्वात वाईट समीक्षक आहे. जेव्हा मी स्वत: ला पडद्यावर पाहिले तेव्हा मला धक्का बसला. लोकांना चित्रपटात मी आवडलो हे आश्चर्यकारक नाही का? कदाचित मी नवीन चेहरा असल्याने असे झाले असेल. मात्र तो असा परपॉर्मन्स नव्हता की पुढे आठवला जाईल. 


अरमान कोहलीने स्टार बनवले


2016 मध्ये, शाहरुख खानने 'यारों की बारात' या शोमध्ये अरमान कोहलीला त्याच्या उत्कृष्ट कारकीर्दीचे श्रेय दिले होते. शाहरुख म्हणाला, माझ्या स्टार होण्यासाठी अरमान कोहली जबाबदार आहे. दिव्या भारतीसोबत तो 'दीवाना' पोस्टरवर दिसला. माझ्याकडे अजूनही ते पोस्टर आहे. मला स्टार बनवल्याबद्दल धन्यवाद.