Salman Khan Out From Inshallah : बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'इंशाअल्लाह' (Inshallah) या सिनेमात सलमान खान (Salman Khan) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं होतं. पण आता या सिनेमातून भाईजानची एक्झिट झाल्याचं समोर आलं आहे.


'हीरामंडी' या वेबसीरिजच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. दरम्यान ते त्यांच्या आगामी सिनेमामुळेही चर्चेत आहेत. संजय यांचा 'इंशाअल्लाह' (Inshallah) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आलेली नाही. 


'इंशाअल्लाह'मधून सलमान खानचा पत्ता कट


'इंशाअल्लाह' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाबाबत सलमान खान (Salman Khan) आणि आलिया भट्टचं (Alia Bhatt) नाव जोडलं जात होतं. पण आता या सिनेमाच्या स्टारकास्टबाबत नवी अपडेट समोर आली आहे.


पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'इंशाअल्लाह' या सिनेमाचं शूटिंग याच वर्षी सुरू होणार आहे. पण आता रिपोर्टनुसार, या सिनेमातील सलमानचा पत्ता कट झाला आहे. भाईजानची जागा शाहरुख खानने (Shah Rukh Khan) घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


संजय लीला भन्साळींसोबत सलमानने केलंय काम


संजय लीला भन्साळी आणि सलमान खानने याआधी एकत्र काम केलं आहे. त्यांचा 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'इंशाअल्लाह'मधून सलमानचा पत्ता कट झाल्याने भाईजानचे चाहते नाराज झाले आहेत. तर शाहरुखच्या चाहत्यांचा मात्र आनंद गगनात मावेनासा झाला आहे.