Urmila Matondkar Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, पण असं असलं तरी ती सोशल मीडियावर चांगली सक्रीय असते आणि तिचा मोठा चाहतावर्ग आहे. उर्मिला मातोंडकर हिने 90 चा काळ गाजवला आहे. 90 च्या दशकात ही मराठमोळी सुंदरी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. सध्या उर्मिला अभिनय क्षेत्रापासून दूर आहे, पण तिचा मोठा चाहतावर्ग आहे. उर्मिला तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत जोडलेली राहते.

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगार

90 च्या दशकात सौंदर्य, दिलखेचक अदा आणि दमदार अभिनयाने उर्मिला मातोडकरने सर्वांना वेड लावलं. नटखट अंदाज, दमदार अभिनय शैलीच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात घर केलं आणि त्या काळातील आघाडीची अभिनेत्री बनली. उर्मिलाने सलमान खान, गोविंदा आणि आमिर खान यांच्यासारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत हिट चित्रपट दिले आहे. एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री गेल्या काही काळापासून ॲक्टिंगपासून दूर आहे. एका चुकीमुळे तिचं करियर उद्धवस्त झालं, कसं ते जाणून घ्या.

'रंगीला गर्ल'च्या एका चुकीमुळे करिअर उद्धवस्त

उर्मिलाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. उर्मिलाचा जन्म 4 फेब्रवारी 1974 रोजी मुंबईत एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. तिने मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये पदवी शिक्षण घेतलं. तिने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. उर्मिला मातोंडकरने 'कर्मा' आणि 'मासूम' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं. पण उर्मिलाला खरी ओळख 'रंगीला' चित्रपटातून मिळाली, हा मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामध्ये ती जॅकी श्रॉफ आणि आमिर खानसोबत दिसली होती. 

'या' चित्रपटामुळे मिळाली प्रसिद्धी

रंगीला चित्रपटामुळे उर्मिलाला प्रसिद्धी मिळाली. ती रातोरात प्रसिद्ध झाली आणि तिला 'रंगीला गर्ल'चा टॅग मिळाला. आजही चाहते तिला याच नावाने ओळखतात. उर्मिला मातोंडकरने 'जानम समजा करो', 'हम तुमपे मारते हैं', 'दिल्लगी', 'सत्या', 'मस्त', 'खुबसूरत' यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिलाने हिंदी चित्रपटांसह तेलुगू, मल्याळम, तामिळ आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

'ही' चूक पडली महागात

'रंगीला' चित्रपटाच्या यशानंतर उर्मिलाने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण कारकिर्दीच्या शिखरावर असताना, उर्मिलाच्या एका चुकीमुळे तिचं अख्खं करिअर उद्ध्वस्त झालं. मीडिया रिपोर्टनुसार, 'रंगीला' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या प्रेमात पडली. याच कारणामुळे राम गोपाल वर्माच्या प्रत्येक चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. पण नंतर ही गोष्ट उर्मिलासाठी समस्या बनू लागली. 

दरम्यान, त्यावेळी उर्मिला मातोंडकर राम गोपाल वर्माच्या प्रेमात होती. त्यामुळे तिने इतर कोणत्याही दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम केलं नाही. यामुळे, हळूहळू इतर सर्व दिग्दर्शक उर्मिला मातोंडकरवर रागावू लागले आणि नंतर त्यांनी उर्मिलाला काम देणं बंद केलं. मात्र, उर्मिला आणि राम गोपाल यांच्यातील नातं फार काळ टिकले नाही आणि ते दोघेही वेगळे झालं. यानंतर उर्मिलाची फिल्मी कारकिर्द संपली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी