Shah Rukh Khan Jawan Sunny Deol Gadar 2 Rajinikanth Jailer Box Office Collection : 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहेत. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan), सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) आणि रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसचा राजा कोण अशा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 


रजनीकांतची क्रेझ कायम (Rajinikanth Jailer Box Office Collection)


रजनीकांतचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात 650 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'जेलर' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे.  भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 343.47 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 235.85 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 62.95 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 29.75 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 13.01 कोटींची कमाई केली आहे. 'जेलर' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 


सनी देओलच्या 'गदर 2'बद्दल जाणून घ्या... (Sunny Deol Gadar 2 Box Office Collection)


सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण आजही या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. तारा सिंह आणि सकीनाचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 23 कोटी, दुसऱ्या आठवड्यात आठ कोटी, तिसऱ्या आठवड्यात 7 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 1.08 कोटी आणि पाचव्या आठवड्यात 0.80 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 517.72 कोटींची कमाई केली आहे.


शाहरुखच्या 'जवान'ने रचला इतिहास (Shah Rukh Khan Jawan Box Office Collection)


शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या 9 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुख खान अभिनीत या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 125 कोटी, दुसऱ्या दिवशी 109 कोटी, तिसऱ्या दिवशी 140 कोटी, चौथ्या दिवशी 157 कोटी, पाचव्या दिवशी 52.39 कोटी, सहाव्या दिवशी 38.21 कोटी, सातव्या दिवशी 34.06 कोटी, आठव्या दिवशी 28.79 कोटी आणि नवव्या दिवशी 26.35 कोटींची कमाई केली आहे. 


संबंधित बातम्या


Jawan Box Office Collection Day 10 : शाहरुखच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिस जिंकलं; दहा दिवसांत जगभरात केली 700 कोटींपेक्षा अधिक कमाई