Shah Rukh Khan Ask SRK Session : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर 'आस्क एसआरके' (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. 

Continues below advertisement


'आस्क एसआरके'दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला विचारलं,"पठाण' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून कसं वाटतं? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"भावा नंबर तर फोनचे असतात. आम्ही फक्त आनंद साजरा करतो". दुसऱ्या एका चाहत्याने शाहरुखला विचारलं आहे,"सर, पठाण सुपरहिट झाला... पण अद्याप सलमानची जागा घेऊ शकला नाहीत". यावर उत्तर देत एसआरके म्हणाला,"सलमान भाऊ आहे तो... ते आजकाल लोक म्हणतात ना GOAT (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम). 










शाहरुखच्या एका चाहत्यानं 'पठाण'च्या यशाबद्दल प्रश्न विचारलं आहे. चाहता म्हणाला,"जास्त प्रमोशन न करताही 'पठाण' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कसं काय धमाका करत आहे?". यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"मी मुलाखतींच्या माध्यमातून 'पठाण'चं प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहा". 






"सिक्स पॅक्स अॅब्स 'जवान'मध्येही असणार का?" चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख खान म्हणाला,"सिक्स पॅक्स अॅब्स तुम्हाला 'पठाण','जवान' आणि 'डंकी'मध्येही पाहायला मिळतील". 'पठाण' कोणामुळे घडला? तुम्ही या सिनेमाची निवड का केली? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत बादशाह म्हणाला,"आदित्य चोप्रा आणि सिद्धार्थ आनंदमुळे 'पठाण'ची निर्मिती होऊ शकली. इतर सर्वांनी त्यांच्या सूचनांचे पालन केले". 










'आस्क एसआरके' दरम्यान एता चाहत्याने विचारले,"पठाण'ला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून कसं वाटतं?" यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"गाणं गा...डान्स करा....पण, कृपया 'पठाण'चा आनंद साजरा करताना एकमेकांची काळजी घ्या". 






संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : पठाण चित्रपटाच्या यशाचे श्रेय कोणाला? किंग खानने स्पष्टच सांगितले...