Shah Rukh Khan Pathan France : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) सिनेमामुळे चर्चेत आहे. जगभरात त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्येही 'पठाण' सिनेमा आणि शाहरुख खान चर्चेत आहे. आज फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांनी (France News Channel) शाहरुखला 'मॅन ऑफ द डे'चा (Man Of The Day) मान दिला आहे. 


फ्रान्सच्या वृत्त वाहिन्यांमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वृत्तनिवेदक शाहरुख खानच्या कामाचं त्याच्या स्टारडमचं कौतुक करताना दिसत आहे. तसेच त्यांनी शाहरुखला जागतिक सुपरस्टारचा दर्जा देण्यासोबत 'मॅन ऑफ द डे'चा मानदेखील दिला आहे. 






जगभरातील शाहरुखचे चाहते 'पठाण' सिनेमाचं कौतुक करत आहेत. त्यामुळे चाहरुखचे चाहते जगभरात आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. किंग खानने 30 वर्षांच्या त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमांत काम करत सर्वांची मने जिंकली आहे. जगभरातील टॉप 5 अभिनेत्यांच्या यादीत शाहरुखची गणना होते. 


शाहरुखच्या 'पठाण'चा परदेशात जलवा!


भारतात रेकॉर्डब्रेक कमाई करणारा शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी परदेशात या सिनेमाने 36 कोटींची कमाई केली होती. जगभरात या सिनेमाने 313 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 






'पठाण' या सिनेमाने सर्वाधिक कमाई करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 'अवतार द वे ऑफ वॉटर' हॉलिवूड सिनेमाला परदेशात या सिनेमाने मागे टाकलं आहे. मागील वर्षात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. पण वर्षाच्या सुरुवातीलाच 'पठाण'ने हिंदी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. 


संबंधित बातम्या


Pathan Worldwide Box Office Day 3 : तीन दिवसात 300 कोटी, जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा जलवा