मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कवी आणि आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हा शो 1 जुलै रोजी प्रसारित झाला होता. यामध्ये कुमार विश्वास यांच्यासह शायर राहत इंदोरी आणि शायरा शबीना अदीब उपस्थित होत्या.
या प्रकरणी दिल्लीच्या डाबरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शोदरम्यान कुमार विश्वास यांनी महिलांवर अपमानजनक आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
शोमध्ये कुमार विश्वास काय म्हणाले?
"निवडणुकीवेळी आपल्या कॉलनी किंवा आपल्या वॉर्डमधून निवडणूक लढताना मोठी अडचण होते. म्हणजेच ज्या मुलीवर तुमचं प्रेम आहे, तिच्या पतीला भावोजी म्हणावं लागतं, भावोजी मत द्या, सामान तर तुम्हीच घेऊन गेलात," असं कुमार विश्वास शोमध्ये म्हणाले होते.
तक्रारदार महिलेने सांगितलं की, "ती तिच्या मुलीसोबत बसून हा शो पाहत होती. आई, आम्ही पण लग्नानंतर सामान बनणार का? असं प्रश्न मुलीने मला विचारला." यानंतर महिला वस्तू असतात का? असा सवाल करत महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
कुमार विश्वास याआधीही महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी वादात अडकले होते. त्यांनी एका कार्यक्रमात दक्षिण भारतीय परिचारिकांच्या रंगरुपावर अपमानजनक टिप्पणी केली होती.