Shah Rukh Khan Changed His Name For Gauri : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर आज शाहरुखचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानदेखील (Gauri Khan) चांगलीच अॅक्टिव्ह आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? गौरीसोबत संसार थाटण्यासाठी शाहरुखने चक्क त्याचं नाव बदललं होतं. 


शाहरुखने गौरीसोबत लग्न करण्यासाठी बदललं स्वत:चं नाव


शाहरुख आणि गौरीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आज एक 'आदर्श जोडपं' म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असलं तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यांची लव्हस्टोरी अर्थातच स्ट्रगलवाली आहे. शाहरुखसोबत लग्न करण्यासाठी गौरीच्या घरच्यांचा विरोध होता. पण पुढे त्यांनी होकार दिला. त्यामुळे शाहरुख आणि गौरीने हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. इतकचं नाही तर त्याने स्वत:चं नाव बदलून 'जितेंद्र कुमार टुल्ली' हे हिंदू नाव ठेवले होते. 


लेखक आणि शाहरुखचा एक मित्र मुस्ताक शेखने त्याच्या पुस्तकात लग्नासाठी शाहरुखने स्वत:चं नाव बदलल्याचा उल्लेख केला आहे. 'जितेंद्र कुमार टुल्ली' (Jitendra Kumar Tulli) या नावाच्या माध्यमातून दोन जुन्या सुपरस्टार्सना मानवंदना दिली आहे. शाहरुखच्या आजीला तो जितेंद्र कुमारसारखा वाटत असल्याने त्याने त्याचं पहिलं नाव ते ठेवलं आणि राजेंद्र कुमार यांचं खरं आडनाव टु्ल्ली होतं. त्यामुळे ही दोन नावं जोडून त्याने 'जितेंद्र कुमार टु्ल्ली' हे नाव ठेवलं. 


गौरीनेदेखील बददलं नाव...


हिंदू रितीरिवाजानंतर मुस्लिम परंपरेनुसार शाहरुख आणि गौरीने लग्न केलं. तसेच कोर्टात जाऊनही त्यांनी लग्न केलं. मुस्लिम रितीरिवानुसार लग्न करण्यासाठी गौरीने तिचं नाव 'आयेशा' ठेवलं होतं. त्यांचं लग्न झालं तेव्हा शाहरुख 26 वर्षांचा आणि गौरी तर फक्त 21 वर्षांची होती. आर्यन, सुहाना आणि अबराम ही त्यांची तीनही मुले आता हिंदी आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांचं पालन करतात. 


शाहरुख खान आणि गौरी सध्या त्यांच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या बहुचर्चित सिनेमात किंग खान मुख्य भूमिकेत झळकणार असून गौरीने या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 7 सप्टेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan House Mannat: चार वर्षांच्या मेहनतीनंतर बनलं शाहरुखचं 'ड्रीम हाऊस', पाहा रॉयल 'मन्नत'चे फोटो