मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने अखेर मुलगी सुहानाच्या बिकिनीवरील फोटोबाबत मौन सोडलं आहे. त्याने असं काही उत्तर दिलं की, सर्वांचं तोंड बंद झालं.

 

 

काही दिवसांपूर्वी बिकिनीवरील सुहानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुहानासोबत तिचा लहान भाऊ अबरामही होता. बिकिनीवरील सुहानाचा हा फोटो चर्चेचा विषय बनला होता.

 



नुकतंच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखला याबाबत विचारलं असता तो म्हणाला की, "सुहाना बीचवर तिच्या भावासोबत बिकीनीवर होती. पण मीडियासाठी मुलीचा बिकिनीवरील फोटो हेडलाईनचा विषय बनला. हे वाईट नाही का? माझी मुलगी 16 वर्षांची आहे आणि या चर्चेमुळे तिला अतिशय ऑकवर्ड वाटत आहे. माझ्या स्टारडममुळे ही छोटी गोष्ट मोठी बनली. या ठिकाणी जर कोणाचा न्यूड फोटो असता तर काहीही फरक पडला नसता. पण ती माझी मुलगी असल्याने; एवढी निगेटिव्ह चर्चा झाली."

 

 

शाहरुखचं हे उत्तर अनेकांच्या तोंडाला कुलुप लावणारं आहे. कारण शाहरुखची सुहाना, अबराम किंवा आर्यन ही तिन्ही मुलं बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अशावेळी छोट्या छोट्या गोष्टीही फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे या गोष्टींची थट्टा होणं किंवा निगेटिव्ह चर्चा होणं चुकीचं असल्याचं शाहरुखचं मत आहे.