Shahrukh Khan Film Festival: बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान (Shahrukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून तो त्याच्या आकर्षणाने आणि प्रेमाने लोकांना जिंकत आलाय. शाहरुख 2 नोव्हेंबर रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या काही आयकॉनिक चित्रपटांचा पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘शाहरुख खान फिल्म फेस्टिव्हल’ या विशेष उपक्रमांतर्गत 'देवदास', 'दिल से', यांसारखे 7 ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहेत. हे प्रदर्शन 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. (Bollywood)
शाहरुखने आपल्या खास विनोदी अंदाजात सोशल मीडियावर ही बातमी शेअर करत लिहिलं, “"माझे काही जुने चित्रपट थिएटरमध्ये परत येत आहेत. त्यातील व्यक्ती फारशी बदललेली नाही, फक्त त्याचे केस थोडे बदलले आहेत आणि तो मनाने थोडा अधिक देखणा झाला आहे." या फेस्टिव्हलदरम्यान देशभरातील निवडक थिएटरमध्ये त्याच्या क्लासिक चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. शाहरुखच्या अविस्मरणीय अभिनयाचा पुन्हा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी चाहत्यांसाठी ही एक खास संधी आहे.
परदेशातही होणार किंग खानच्या सिनेमाचं प्रदर्शन
याचबरोबर, शाहरुखचे चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, यूके, युरोप आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्येही पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. म्हणजेच, ‘किंग खान’चा जल्लोष जागतिक स्तरावर रंगणार आहे. दरम्यान, शाहरुख सध्या आपल्या पुढच्या मोठ्या अॅक्शन फिल्म ‘किंग’वर काम करत आहे. ही फिल्म त्याची मुलगी सुहाना खानसोबत आहे, आणि यात दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन आणि इतर कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण युरोपमध्ये जोमात सुरू असून, वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज होऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
7 चित्रपट होणार पुन्हा प्रदर्शित
शाहरुखने त्याच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "शाहरुख खान चित्रपट महोत्सव 31 ऑक्टोबर रोजी पीव्हीआर आयनॉक्सच्या सहकार्याने भारतातील निवडक चित्रपटगृहांमध्ये सुरू होत आहे आणि मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, यूके, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये वायआरएफ इंटरनॅशनल द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केला जाईल." अभिनेत्याच्या आगामी सात चित्रपटांमध्ये "मैं हूं ना," "ओम शांती ओम," "कभी हा कभी ना," "देवदास," "दिल से," "चेन्नई एक्सप्रेस," आणि "जवान" यांचा समावेश आहे.