Pathan Fans in Germany: केवळ भारतातच नाही तर जगभारातील बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखनं चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. त्यामुळे शाहरुखचे चाहते सध्या या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. पठाण चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. शाहरुखच्या जर्मनीमधील (Germany) चाहत्यांनी नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला शाहरुखनं कमेंट केली आहे. 


शाहरुखच्या जर्मनीमधील चाहत्यांनी 'झुमे जो पठाण' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'शाहरुख, कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही डान्स करत आहोत. आम्ही आशा करतो की, तू पुन्हा जर्मनीला भेट देशील.' हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 49 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला असून या व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं आहे.


शाहरुखची कमेंट


जर्मनीमधील चाहत्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला शाहरुखनं कमेंट केली आहे. त्यानं या व्हिडीओला कमेंट करत लिहिलं, 'एवढ्या थंडीमध्ये डान्स केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.'










पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांमधील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 13 दिवस झाले आहे. पठाण हा चित्रपट भारतात 450 कोटींचा टप्पा लवकरच पार करेल, असं म्हटलं जात आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Pathaan Box Office Day 13: 'पठाण' च्या कमाईत घट; जाणून घ्या 13 व्या दिवसाचं कलेक्शन