Dunki Song Out : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'लुट पूट गया' (Lutt Putt Gaya) हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नव्या गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
शाहरुख खान 2023 मध्ये 'डंकी'च्या माध्यमातून तिसऱ्यांदा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. वर्षाच्या शेवटी किंग खानचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने डंकीचा फर्स्ट ड्रॉप शेअर केला होता. आता ड्रॉप 2 देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'डंकी'तील पहिलं गाणं आऊट (Dunki First Song Out)
'डंकी' सिनेमातील 'लुट पूट गया' या पहिल्या गाण्यात शाहरुख खान, तापसी पन्नूची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही तरुण दिसत आहेत. किंग खान आणि तापसी पन्नूच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शाहरुखने 'डंकी' या सिनेमाच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, पठाण, आणि जवाननंतर आता डंकी करणार धमाका, डंकीसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, किंग खानला जलवा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'डंकी' कधी होणार रिलीज? (Dunki Release Date)
शाहरुखचा आगामी 'डंकी' हा सिनेमा रिलीज आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमात तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'डंकी' हा बहुचर्चित सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. 'डंकी' या सिनेमाला U सर्टिफिकेट मिळाले आहे. 'डंकी' या सिनेमात शाहरुख आणि तापसीसह विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
शाहरुख अन् प्रभास आमने-सामने
शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाची दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत (Prabhas) टक्कर होणार आहे. शाहरुखचा 'डंकी' 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून प्रभासचा 'सालार' (Salar) 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही बिग बजेट सिनेमे असून दोन्ही सिनेमांसाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा बाजी मारणार हे पाहावे लागेल.
संबंधित बातम्या