शाहरुख - आलियाच्या नव्या सिनेमाचं नाव ठरलं !
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2016 09:58 AM (IST)
मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता शाहरुख खान स्टारर आगामी सिनेमाचं नाव अखेर ठरवण्यात आलं आहे. 'डिअर जिंदगी' असं या सिनेमाचं नाव असेल. या आधी 'वॉक अॅण्ड टॉक' असं या सिनेमाचं नाव ठरवण्यात आलं होतं. गौरी शिंदेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरने निर्मिती केली आहे. आलिया भट्ट या सिनेमात फिल्ममेकरच्या भूमिकेत असेल तर शाहरुख सायकॅट्रिसच्या भूमिकेत दिसणार आहे.