नवी दिल्ली: आयकर विभागाने बॉलीवूडचा किंग खान शाहरूखला कर चुकवेगिरीबद्दल कालच नोटीस पाठवली होती. आता आयकर विभागाने इतर बॉलीवूड स्टारवर करडी नजर ठेवली असून आज इतर दोन सेलिब्रेटींनाही नोटीस पाठवली आहे.

 

आयकर विभागाच्या सेवा कर विभागाने आमीर खान आणि रणवीर सिंहला टॅक्स भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. सेवा कर विभागाने यशराज फिल्मस, सलमान खान फिल्म्स, आमीर खान फिल्म्स आणि रणवीर सिंह आदींना आपले पेमेंट डिटेल्स सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. ही सर्व माहिती विभागाच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी मागितली होती.

 

सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइझ अॅन्ड कस्टमने टॉप फिल्म प्रोडक्शन हाऊसना आपले कर भरल्याचे विवरण सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. या अंतर्गतच आमीर खान आणि रणवीर सिंह यांना त्यांनी कर भरणा केलेली सर्व माहिती मागवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमान खान, यशराज फिल्मस आदींनाही सर्व पेमेंटची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. चित्रपट क्षेत्रातील जाणकारांच्या मते आयकर विभाग हाय प्रोफाईल डिफॉल्टरवरील पकड आवळत असून त्यांच्याकडून सेवा कर वसूल केला जाऊ शकतो.

 

दरम्यान, आयकर विभागाच्या वतीने बॉलीवूडचा किंग खान शाहरूखला नोटीस पाठवण्यात असून, आयडीएस स्किम अंतर्गत अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने काळ्या पैशांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत प्रसिद्ध व्यक्तींना अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आला आहे.

 

मोदी सरकारच्या मोहिमेमुळे शाहरुख खानला नोटीस