भाग्यश्रीच्या सासरच्या मंडळींच्या घरातून जवळपास 25 लाखांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी झाली होती. कलम 328 (गुन्हा करण्याच्या हेतूने विषारी द्रव्य देणे) अन्वये संजय कुमारला 4 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. राकेश जैसवार, राजेश चव्हाण आणि चंदन उर्फ मंगल रामाश्रय या तिघांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे.
इरला सोसायटीत राहणाऱ्या 73 वर्षीय पन्नालाल आणि 72 वर्षीय शकुंतला दासानी यांच्या घरी संजय कुमार घरकामाला होता. मात्र त्याने आपलं नाव रितेश असल्याचं सांगितलं होतं. 24 जानेवारी 2014 च्या रात्री 9 वाजता त्याने दासानी दाम्पत्याला कॉफीतून झोपेच्या गोळ्या दिल्या. दोघांची शुद्ध हरपल्याचा फायदा घेत त्याने सहकाऱ्याला बोलवत 25 लाखांची लूट केली.
शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी दासानींचा मुलगा हिमालय यांना बोलावलं. पोलिसात तक्रार केल्यानंतर राजेश आणि चंदन या संशयितांना दोन ते चार तासात ताब्यात घेण्यात आलं होतं, तर संजय कुमारला जवळपास वर्षभराने पकडण्यात आलं होतं.