Seema Sajdeh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोहेल खानची (Sohail Khan) एक्स वाइफ सीमा सजदेह (Seema Sajdeh) ही  द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइफ   (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमुळे चर्चेत होती. सीमा ही फॅशन डिझाइनर आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं  (Karan Johar) 25 नोव्हेंबर रोजी एका पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये सीमानं हजेरी लावली होती. पार्टीसाठी सीमानं खास लूक केला होता. या पार्टीनंतर सीमानं पॅपराझीसाठी पोज दिली. पोज देत असतानाच सीमाचा तोल डगमगला. त्यामुळे  सध्या काही नेटकरी सीमाला ट्रोल करत आहेत. 


व्हायरल व्हिडीओमध्ये सीमा ही बॉसी लूकमध्ये दिसत आहे. पोज देत असतानाच अचानक सीमाचा तोल गेला. त्यानंतर सीमा बी भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. सीमाच्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 'दारु जास्त झाली का?', 'दारु जास्त झाली तरीही फोटोसाठी पोज देत आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सीमाच्या या व्हायरल व्हिडीओला केल्या. 


पाहा व्हायरल व्हिडीओ: 






सीमा ही फॅशन डिझाइनर आहे. सीमाचे एक फॅशन स्टोर देखील आहे. या फॅशन स्टोरचे नाव 'बांद्रा 190' असं आहे. सीमानं Fabulous Lives of Bollywood Wives या शोमध्ये काम केलं असून ती सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. सीमा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.


'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाच्या सेटवर सोहेल आणि सीमा यांची भेट झाली. 1998 मध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांना निर्वाण आणि योहन नावाची दोन मुलं आहेत. रिपोर्टनुसार, लग्नानंतर 24 वर्षांनी सीमा आणि सोहेलनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Sohail Khan, Seema Sajdeh : सोहेलसोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर सीमाची प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी माझ्या मुलांना आणि कुटुंबाला...'