माजिद मजिदींच्या 'बियॉन्ड द क्लाऊड्स'चा दुसरा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2018 09:28 PM (IST)
ऑस्कर विजेते इराणी दिग्दर्शक माजीद माजिदी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. मानवी नातेसंबंध, कौटुंब व्यवस्था यांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांचा दांडगा अनुभव माजिदी यांना आहे.
मुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याच्या 'बियॉन्ड द क्लाऊड्स' या आगामी सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात मालविका मोहनन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. ऑस्कर विजेते इराणी दिग्दर्शक माजीद मजिदी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. मानवी नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था यांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांचा दांडगा अनुभव मजिदी यांना आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. त्यामुळे 'बियॉन्ड द क्लाऊड्स' या त्यांच्या आगामी सिनेमाची उत्सुकताही मोठी आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर कथानक आधारलेलं असल्याची माहिती मिळते आहे. सिनेमाच्या कथानकाला भारतातील पार्श्वभूमी आहे. अनेक सीन तर मुंबईत चित्रित करण्यात आले आहेत. या सिनेमात ईशान आणि मालविका आपल्या सिनेक्षेत्रातील पदार्पण करत असून, पहिलाच सिनेमा थेट माजीद मजिदी यांच्या दिग्दर्शनात करत आहेत. येत्या 20 एप्रिल रोजी सिनेमा भारतासह जगभर प्रदर्शित होणार आहे. भावाच्या सिनेमाचा ट्रेलरची यूट्यूब लिंक ट्विटरवर शेअर करताना अभिनेता शाहिद कपूरने हटके ट्वीट केले आहे. शाहिदने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "Acting toh Khoon mein hai. Ise dekho. When did he grow up so much."