नवी दिल्ली : ‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. प्रिया आणि दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांच्याविरोधातील मुंबई आणि हैदराबादमधील तक्रारीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारसह तक्रारदारांकडून उत्तरही मागितले आहे.

प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्यावरुन वाद सुरु आहे. यावरुन मुंबई, हैदराबादमध्ये प्रिया आणि दिग्दर्शक ओमर यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर या तक्रारी रद्द करण्यासाठी प्रियासह दिग्दर्शकाने सुप्रीम कोर्टाचा दार ठोठावला होता. आज सुप्रीम कोर्टाने या तक्रारींना स्थगिती दिली आहे.

प्रिया वारियरने याचिकेत काय म्हटले आहे?

आपल्या मुलभूत अधिकारांचा उल्लेख करत प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीररित्या व्यावसाय करण्याचा घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार आहे. गाण्याचा चुकीचा अनुवाद केल्याचा आरोप करत तक्रारदार आमच्या मुलभूत अधिकारांचं हनन करत आहेत, असे प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

प्रकरण काय आहे?

‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यावरुन वाद झाला आहे.हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटात प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे.

काय आहे व्हिडिओ?

ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातील हे गाणं आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं असून व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे.शाळेच्या गॅदरिंगमध्ये

एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत.

कोण आहे प्रिया प्रकाश वारियर?

प्रिया प्रकाश वारियर. प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स,

मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे.

पाहा गाण्याचा व्हिडीओ :