Satish Shah Passed Away: बॉलिवूडमधील प्रसिद्ध हास्य कलाकार सतीश शाह यांचं शनिवारी निधन झालं. दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली. जवळपास चार दशकं सतीश शाह यांनी हिंदी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांचा विनोदबुद्धी, टायमिंग आणि सहज अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या आणि सहकलाकारांच्या मनात घर करून गेले. (Main Hun Na Spitting Professor)

Continues below advertisement


थुंकणाऱ्या प्रोफेसरचा टेक, सगळेच लोटपोट पण  


‘मैं हूं ना’ या सुपरहिट चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या जबरदस्त कॉमिक टाइमिंगमुळे एक मजेशीर किस्सा घडला होता. सतीश शाह यांनी स्वतः एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला होता. या चित्रपटात दिग्दर्शक फराह खान यांनी त्यांना दोन भूमिका ऑफर केल्या होत्या. एक कॉलेजच्या प्रिन्सिपलची आणि दुसरी ‘थूंकणाऱ्या प्रोफेसरची’. सतीश यांनी दुसरा रोल निवडला, कारण तो त्यांच्या कॉमिक स्टाइलला साजेसा वाटला.


चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. पहिल्याच टेकमध्ये सतीश म्हणाले, “क्लास, अटेंशन!” आणि त्यांनी थोडं ‘थूकण्याचं’ अभिनय केला. तेवढ्यात शाहरुख खान, सुष्मिता सेन आणि सेटवरील सगळेच लोक हसून लोटपोट झाले! सतीश यांना वाटलं की त्यांचा शॉट चुकला आहे. पण फराह खान यांनी “कट” न म्हणता उलट “परफेक्ट, पुन्हा करा” असं सांगितलं. दुसऱ्या टेकमध्येही तोच प्रकार पुन्हा हशा! असं करत आठ टेक झाले, आणि सगळेच हसून थांबेनासे झाले. सतीश शाह यांच्या चेहऱ्यावर राग आणि नाराजी दिसू लागली. त्यांनी ठरवलं की ते ही फिल्म सोडणार, कारण सगळे त्यांची टर उडवत आहेत. ते थेट फराह खानकडे गेले आणि म्हणाले, “हे काय चाललंय? असंच चाललं तर मी निघतो.”


तेव्हाच शाहरुख खान मध्ये पडला आणि म्हणाला, “सर, तुम्ही गैरसमज करून घेतलात. तुमचा अभिनय इतका रिअल आहे की आम्ही हसू थांबवू शकत नाही. पण सीन परफेक्ट आहे.” नंतर टीमने उपाय काढला, सतीश शाह यांचे शॉट्स वेगळे शूट केले आणि इतर कलाकारांचे वेगळे. शेवटी एडिटिंगमध्ये तो सीन परफेक्ट जमला आणि चित्रपट रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी त्या सीनवर अक्षरशः डोक्यावर घेतलं.‘थुंकणारा प्रोफेसर’ हा सतीश शाह यांचा रोल आजही लोकांना आठवतो, आणि त्यांची ही कॉमिक शैली सदैव प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील हे नक्की.


बॉलीवूडचा विनोदी अभिनेता हरपला!


अभिनेते सतीश शहा यांचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन झाले आहे . किडनीच्या आजारामुळे ते त्रस्त होते. 74 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे .