Satish Kaushik Birth Anniversary : लोकप्रिय अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे खास मित्र अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक व्हिडीओ शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 






सतीश कौशिक यांच्या जयंतीनिमित्त अनुपम खेर यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"माझा जिवलग मित्र सतीश कौशिक. वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. आज तू 67 वा वाढदिवस साजरा करू शकला असतास. पण तुझ्या आयुष्यातील 48 वाढिवस साजरे करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे आज संध्याकाळी मी तुझा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचं ठरवलं आहे".


अनुपम खेर यांनी पुढे लिहिलं आहे,"शशी आणि वंशिकाच्या मधली खूर्ची मात्र रिकामी असेल. माझ्या मित्र-मंडळींना विनंती करतो की सतीशच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी नक्की या". अनुपम खेर यांच्या या भावनिक पोस्टवर चाहते कमेंट्स करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.


अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सतीश कौशिक, अनुपम खेर आणि अनिल कपूर दिसत आहेत. हे तिघेही एकमेकांचे खास मित्र होते. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमीदेखील अनुपम खेर यांनीच दिली होती. 


अनुपम खेर यांनी ट्वीट केलं होतं,"मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे!' हे माहित आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहावे लागेल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती".






संबंधित बातम्या


Satish Kaushik Passes Away: प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक