अंगावर शहारा आणणारा 'सरबजीत'चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2016 08:29 AM (IST)
मुंबई : बहुचर्चित सरबजीत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता रणदीप हुडा यांचा दमदार अभिनय दिसत आहे. भावाच्या न्यायहक्कांसाठी लढणारी बहिण ऐश्वर्याने या सिनेमात जिवंत केली आहे. 'सरबजीत' चित्रपटामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या सरबजीतच्या बहिणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सरबजीतच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. हेर समजून सरबजीतला पाकिस्तानच्या तुरुंगात 23 वर्ष डांबण्यात आलं होतं. जेलमधील इतर कैद्यांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. मेरी कोम फेम दिग्दर्शक ओमंगकुमार यांनीच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ऐश्वर्या सरबजीतची बहिण दलबीर कौरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 19 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.