उघड्या डोळ्यांनी जग पाहाता येत नसलं तरी आपल्या अंधाऱ्या जगात तिने स्वप्नं मात्र खूप पाहिली आहेत. बहिण भावामधलं अतूट नातं, त्यांचं निरपेक्ष प्रेम त्याच स्वप्नांची गोष्ट सांगणारा खारी बिस्कीट हा चित्रपट 27 सप्टेंबरला आपल्या भेटीला येतोय.
आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर हे दोन बालकलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. आदर्शने यात बिस्कीटची भूमिका साकारली आहे तर वेदश्री खारीच्या टायटल रोलमध्ये दिसणार आहे. ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हन आणि झी स्टुडिओज यांनी 'खारी बिस्किट'ची निर्मिती केली आहे.