Samrat Prithviraj : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज'  (Samrat Prithviraj) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 3 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा अयशस्वी ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने फक्त 55.05 कोटींची कमाई केली आहे. आता 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक जात नसल्याने शो रद्द करण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

'सम्राट पृथ्वीराज'ने केली 55.05 कोटींची कमाई

'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा 300 कोटींपेक्षा अधिक बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा सिनेमा 3 जूनला 3550 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 10.70 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 12.60 कोटी, तिसऱ्या दिवशी 16.10 कोटी, चौथ्या दिवशी पाच कोटी तर पाचव्या दिवशी 4.25 कोटी तसेच सहाव्या दिवशी 3.60 कोटींची कमाई केली आहे. तर गुरुवारी या सिनेमाने 2.80 कोटी कमावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने फक्त 55.05 कोटींची कमाई केली आहे. 

Continues below advertisement

'धाकड'नंतर 'सम्राट पृथ्वीराज' झाला फ्लॉप

बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पण कंगनाचा 'धाकड' मात्र फ्लॉप ठरला आहे. कंगनाच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. अद्याप चाहत्यांची ही क्रेझ कमी झालेली नाही. 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. 

'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमासाठी अक्षय कुमारने 60 कोटींचे मानधन घेतले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

संबंधित बातम्या

Samrat Prithviraj box Office collection : 'धाकड'नंतर 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला; 'भूल भुलैया 2' ठरतोय सुपरहिट

Samrat Prithviraj : '...म्हणून सम्राट पृथ्वीराज चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही'; सोनू सूदनं सांगितलं कारण