Sam Bahadur Box Office Collection Day 9 : विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे रणबीरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना विकीच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाने आपला जलवा कायम ठेवला आहे. रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे.
विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'अॅनिमल'च्या त्सुनामीत विकीच्या 'सॅम बहादुर'चा जलवा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
'सॅम बहादुर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Sam Bahadur Box Office Collection)
'सॅम बहादुर' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 6.25 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 9 कोटी, तिसऱ्या दिवशी 10.3 कोटी, चौथ्या दिवशी 3.5 कोटी, पाचव्या दिवशी 3.5 कोटी, सहाव्या दिवशी 3.25 कोटी, सातव्या दिवशी 3 कोटी, आठव्या दिवशी 3.5 कोटी, नवव्या दिवशी 6.75 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने 51.85 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 66.4 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस : 6.25 कोटी
दुसरा दिवस : 9 कोटी
तिसरा दिवस : 10.3 कोटी
चौथा दिवस : 3.5 कोटी
पाचवा दिवस : 3.5 कोटी
सहावा दिवस : 3.25 कोटी
सातवा दिवस : 3 कोटी
आठवा दिवस : 3.5 कोटी
नववा दिवस : 6.75 कोटी
एकूण कमाई - 51.85 कोटी
'सॅम बहादुर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6.25 कोटींचा गल्ला जमवला होता. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाची क्रेझ आजही कायम आहे. विकी कौशला मोठा चाहतावर्ग असून ते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होईल. रणबीरच्या 'अॅनिमल'चा हा रेकॉर्ड ब्रेक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'सॅम बहादुर' या सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 'सॅम बहादुर' हा वर्षाअखेरीस आलेला एक उत्तम बायोपिक आहे. 'सॅम बहादुर' या सिनेमात विकी कौशलने सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेखने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तसेच सान्या मल्होत्रादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
संबंधित बातम्या