पर्यावरण दिनानिमित्त सलमानकडून ई-सायकल लाँच
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2017 09:26 PM (IST)
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभिनेता सलमान खानने आपल्या बीईंग ह्युमन या ब्रँडअंतर्गत ई-सायकल लाँच केली. या सायकलच्या लाँचच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सलमान स्वतः घरापासून मेहबूब स्टुडिओपर्यंत सायकल चालवत पोहोचला. बीईंग ह्युमनच्या या ई-सायकलची किंमत 40 हजार ते 57 हजारांपर्यंत असणार आहे. ही सायकल चालवण्यासाठी कोणत्याही लायसन्सची किंवा वाहन नोंदणीची गरज लागणार नाही. नेहमीच्या सायकलप्रमाणे पॅडल मारुन ही सायकल चालवता येईल. पांढरा, लाल, काळा, पिवळा अशा चार रंगात ही सायकल बाजारात उपलब्ध होणार आहे. या सायकलचा जास्तीत जास्त वेग ताशी 25 किलोमीटर इतका असेल. कशी असेल सायकल? पाहा व्हिडिओ : https://twitter.com/BeingSalmanKhan/status/871684518935015425