सलमानच्या आवाजात 'सुलतान'चं टायटल सॉन्ग
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2016 11:54 AM (IST)
मुंबई : पुढल्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या 'सुलतान' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खानने कंबर कसली आहे. या सिनेमातील 'जग घुमया' गाण्यानंतर आता दुसरं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणंही सलमानच्याच आवाजात असून, हे गाणं सिनेमाचं टायटल ट्रॅक आहे. सलमानने याआधी अरिजित सिंहचं 'जग घुमया' गाणं आपल्या आवाजत रिलीज केलं होतं. आता टायटल सॉन्गच सलमानने ट्विटरवर शेअर केलं आहे. याआधीही सलमान खानने अनेक सिनेमांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. हॅलो ब्रदर, किक आणि हिरो सिनेमात सलमानने गाणं गायलं होतं. 'सुलतान'मधील गाण्यावरुन गायक अरिजित सिंह आणि सलमान खान यांच्यात वाद झाला होता.