अवैध शस्त्रास्त्र प्रकरणी मुक्ततेनंतर सलमानचा पहिला ट्वीट
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2017 03:30 PM (IST)
मुंबई : 18 वर्ष जुन्या अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याच्या खटल्यात अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. जोधपूर कोर्टाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केल्यानंतर सलमानने ट्वीटवरुन आभार व्यक्त केले आहेत. 'मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि तुमच्या शुभेच्छांबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.' असं ट्वीट करत सलमानने चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. दुपारी 11.45 च्या सुमारास सलमानच्या वकिलांनी कोर्टाने सलमानला निर्दोष मुक्त केल्याची माहिती दिली. त्यानंतर 12.36 वाजता सलमानने ट्वीटवरुन धन्यवाद दिले आहेत. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/821614675141992449 काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सलमान खान आदल्याच दिवशी जोधपूरमध्ये दाखल झाला होता. मात्र सुनावणीवेळी न्यायाधीश कोर्टात पोहोचले, तरी सलमान पोहोचला नव्हता. त्यामुळे कोर्टाने सलमानला अर्ध्या तासांचा वेळ दिला होता. त्यादरम्यान सलमान कोर्टात पोहोचला आणि काही अवघ्या दोन मिनिटांत निकाल आला. या खटल्यात सलमानला संशयाचा फायदा मिळाला. त्यामुळे सलमान निर्दोष सुटला. सलमानवर आरोप सिद्ध झाले असते, तर त्याला 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ झाली असती.