मुंबई : मागील 29 वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका भामट्याला बुधवारी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा भामटा अभिनेता सलमान खानच्या गोराई बीच येथील फार्महाऊस मध्ये आपली ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. अखेर पोलिसांनी त्याचा भांडाफोड करत त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव शक्ती सिद्देश्वर राणा आहे.
आरोपीने 1990 मध्ये आपल्या साथीदारांसह एका व्यक्तीच्या घरात घुसून जबरी चोरी करत मारहाण केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. कालांतराने तो जमिनीनावर मुक्त झाला होता. परंतु या नंतर मात्र तो न्यायालयात नियमितपणे हजर न राहता आपली ओळख लपवून गोराई बीच येथील सलमानच्या फार्महाऊसमध्ये 15 वर्षांपासून राहत होता. सलमानच्या बंगल्यावर गेल्या 15 वर्षांपासून शक्ती हा केअर टेकर म्हणून काम करीत होता. सध्या शक्ती याचे वय 62 वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबईच्या वरळी येथे सन 1990 मध्ये शक्ती राणा आणि त्याच्या साथीदार एका घरात घुसले. घरातील व्यक्तींना मारहाण केली आणि किंमती वस्तू घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी शक्ती आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मिळाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर शक्ती फरार झाला तो कधीच न्यायालयात सुनावणीसाठी आला नाही.
त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, पोलिसांकडील पत्त्यावर तो सापडला नाही. पोलिसांनी खबरे, तांत्रिक पुरावे या आधारे शक्ती गोराई परिसरात राहात असल्याचे समजले. गुन्हे शाखेच्या पथकाने गोराईचा परिसर पिंजून काढला त्यावेळी येथील एका बंगल्यात तो सापडला. चौकशीमध्ये हा बंगला सलमान खान याचा असल्याचे स्पष्ट झाले.
सलमान खानच्या केअर टेकरला अटक, जबरी चोरी करुन 29 वर्ष पोलिसांना देत होता गुंगारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2019 09:07 AM (IST)
मुंबईच्या वरळी येथे सन 1990 मध्ये शक्ती राणा आणि त्याच्या साथीदार एका घरात घुसले. घरातील व्यक्तींना मारहाण केली आणि किंमती वस्तू घेऊन पसार झाले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -