सुलतानची रेकॉर्डब्रेक कमाई, तरीही सलमान नाराज
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2016 03:09 PM (IST)
नवी दिल्लीः सलमान खान नेहमीच सिनेमांच्या तिकीट दरवाढी विरोधात आहे. त्यामुळे सुलतान सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला असला तरी देखील वाढलेल्या तिकीट दरांमुळे सलमान नाराज असल्याचं बोललं जात आहे. सिनेमांचे तिकीट दर कमी होण्यासाठी नवीन थिएटर्स सुरु करणं गरजेचं असल्याचं सलमानने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र सुलतानचे दर वाढल्यामुळे अनेक प्रेक्षक सिनेमा पाहू शकलेले नाहीत, याची खंत सल्लूला सतावत आहे. त्यामुळेच तो नाराज असल्याचं बोललं जात आहे.