मुंबई : अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लॉन्च केल्यानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी अश्वमी मांजरेकरला लवकरच लॉन्च करणार आहे. आपल्या आगामी दबंग-3 मध्ये लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे.


सलमान खानने अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हांची मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत काम केलं आहे. आता महेश मांजरेकरांच्या मुलीसोबतही सलमान रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 2010 मध्ये दबंगमधून सोनाक्षी सिन्हाला सलमानने ब्रेक दिला होता. दबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांच्या कन्येला सलमान ब्रेक देणार आहे.

दबंग-3 च्या निर्मात्यांना या सिनेमासाठी आणखी एक अभिनेत्री हवी होती. यासाठी आधी मौनी रॉयचं नाव चर्चेत होतं. मात्र मौनीने नकार दिल्यानंतर अश्वामी मांजरेकर या सिनेमात दिसणार आहे.

सलमान खानचे खास मित्र आहेत महेश मांजरेकर!

अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर हे खूप चांगले मित्र आहेत. सलमानला जेव्हा कळलं की महेश मांजरेकरांची मुलगी बॉलीवूडमध्ये काम करु इच्छिते, तेव्हा लगेच सलमानने तिला लॉन्च करण्याचं प्लानिंग बनवलं.

अश्वमीची भूमिका या सिनेमात कोणती असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नसली तरीही सोनाक्षीच्या बरोबरीचा रोल तिला देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

कोण आहे अश्वामी मांजरेकर?

अश्वमी महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा यांची मुलगी आहे. 29 ऑगस्ट 1988 ला जन्मलेल्या अश्वमीला सत्या नावाचा भाऊही आहे.

महेश मांजरेकरांनी दुसरं लग्न मेधा मांजरेकर यांच्याशी केलं. त्यांना सई नावाची एक मुलगीही आहे. अश्वमीचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे ज्याचं नाव अश्वमी फिल्म्स प्रा. लिमिटेड आहे.