मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा गॉडफादर आहे. सलमान त्याचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला म्हणजे टायगरला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची चर्चा आहे.


गेल्या 30 वर्षांपासून बॉडीगार्ड असलेल्या शेरा म्हणजेच गुरमीत सिंग जॉलीशी सलमानचं घट्ट नातं झालं आहे. सलमानच्या बॉडीगार्ड सिनेमाच्या टायटल ट्रॅकमध्येही शेरा दिसला होता. सलमान अनेकदा त्याच्या मुलाचं कौतुक करताना दिसायचा.

'टायगरचे लूक्स आणि व्यक्तिमत्त्व पाहता आम्हाला आमचा हिरो मिळाला आहे. तो फोकस्ड आहे' असं सलमान म्हणतो. टायगरच्या जन्मावेळी 'ये हिरो बनेगा. मै बनाऊंगा' असं सलमान म्हणाला होता. सलमान कायमच आपला शब्द पाळत आल्याचं त्याचे निकटवर्तीय म्हणतात.

सलमान खान 'या' अभिनेत्याला लाँच करणार

सलमान टायगरला पुढच्या वर्षी सिनेमातून लाँच करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. एखाद्या अॅक्शन मूव्हीतून नवोदित अभिनेत्रीसोबत तो झळकेल, असा अंदाज आहे. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सलमान मेव्हणा आयुष शर्माला 'लव्हरात्री' चित्रपटातून लाँच करत आहे. त्यानंतर मित्र इक्बाल रत्नासी यांचा मुलगा झहीरलाही बॉलिवूडमध्ये आणणार आहे. त्यापाठोपाठ टायगरचं लाँचिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॉलिवूडला टायगरच्या रुपाने नवा चार्मिंग आणि डॅशिंग हिरो मिळणार का, याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.