Salman Khan Death Threat Accused : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याला मिळत असलेल्या धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम विश्नोईला (Dhakad Ram Bishnoi) अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी धाकडवर कारवाई केली आहे. त्याने सलमानला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती.


सलमानने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता 21 वर्षीय धाकड राम विश्नोईला पोलिसांनी मुंबईत आणले आहे. धाकड राम विश्नोईवर पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Punjabi Singer Sidhu Moose Wala) वडिलांना धमकावल्याचाही आरोप आहे. सलमानला धमक्या मिळत असल्याने पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. 


एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने सलमानला माफी मागायला सांगितली होती. तसेच माफी न मागितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा साथीदार गोल्डी यांच्याविरुद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सलमानचा मित्र प्रशांत गुंजाळकरच्या वतीने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.






पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या चाहत्यांना आता गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर थांबता येणार नाही. एबीपी न्यूजच्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता की,"मी सलमानला धमकी दिलेली आहे. त्याने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिलेली नाही. आमच्या भागात येऊन त्याने शिकार केली आहे. त्यामुळे त्याने आता आमच्या समाजाची माफी मागावी. पण त्याला मिळालेल्या धमकीच्या पत्राचा आणि माझा काहीही संबंध नाही."


सलमानच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर सलमान खान घाबरलेला नाही. पण कुटुंबात अजून तणाव निर्माण होऊ नये यासाठी सगळं काही ठीक असल्याचं तो भासवत आहे. कुटुंबियांसाठी त्याने त्याचे सध्याचे प्लॅन्सदेखील रद्द केले आहेत. तो सध्या कोणत्याही सिनेमाचं शूटिंग किंवा प्रमोशन करत नाही. तसेच या सुरक्षा व्यवस्थेवर आक्षेप आहे". 


संबंधित बातम्या


Salman Khan: बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार, भाईजानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा