Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Movie : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. गेल्या वर्षी निर्मात्यांनी या मालिकेची कार्टून सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता नुकत्याच एका मुलाखतीत निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी या लोकप्रिय मालिकेवर सिनेमा येणार असल्याची घोषणा केली आहे. 


असिद कुमार मोदी म्हणाले,"तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आज 15 वर्षानंतरही प्रेक्षक ही मालिका पाहायला पसंती दर्शवत आहेत. आज ही मालिका प्रेक्षक फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर ओटीटी, युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरदेखील पाहत आहेत. मालिकेतील जेठालाल, बबीता, दयाबेन, सोढीसह अनेक पात्र आज अनेक कुटुंबाचा भाग झाले आहेत. 15 वर्षांपासूनच प्रेक्षकांचं प्रेम आजही कायम आहे". 


असिद कुमार मोदी पुढे म्हणाले की,"तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेवर आता मी सिनेमा बनवणार आहे. हा अॅनीमेटेड सिनेमा असून लवकरच या संदर्भात अधिक माहिती देईन. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल".  


'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेवर आधारित कार्टून शो गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर गेल्या महिन्यात असिद मोदी यांनी लहान मुलांसाठी 'TMKOC Rhymes' लॉन्च केलं होतं. त्यानंतर 'रन जेठा रन' (Run Jetha Run) नावाचा गेम सुरू करुन गेमिंगच्या क्षेत्रातही प्रवेश केला. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला भाग 28 जुलै 2008 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेतील मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


गोकुळधाम सोसायटीत एकही घर नाही!


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी खास सेट तयार करण्यात आला आहे. या मालिकेचं चित्रीकरण गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. फिल्मसिटीमध्ये 'गोकुळधाम सोसायटी'चा सेट बांधण्यात आला आहे. मात्र, या सोसायटीत ना कुठलं घर आहे, ना इथे कुणी राहतं. 


संबंधित बातम्या


Disha Vakani : 'तारक मेहता का...' मालिकेतील दयाबेन कोट्यवधींची मालकीण; संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!