Salman Khan Smoking : 'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss Ott 2) या कार्यक्रमावर टीका होत आहे. दरम्यान आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवरदेखील (Salman Khan) टीका होत आहे. 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाचा सलमान होस्ट आहे. आता या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान कॅमेरासमोर सिगरेट ओढतानाचा सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमातील 'वीकेंड का वार'च्या शूटिंगदरम्यानचा सलमानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये भाईजान कॅमेरासमोर सिगरेट ओढताना दिसत आहे. एडिटिंग टीमच्या चुकीमुळे हा सीन प्रसारित झाल्या असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नेटकरी मात्र सलमानची शाळा घेत आहेत. 


'बिग बॉस ओटीटी' दरम्यान सलमान खान दिसला सिगरेट ओढताना


'बिग बॉस' (Bigg Boss) संबंधित अपडेट्स देणाऱ्या बिग बॉस तकने सलमान खानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमुळे सलमान खान 'बिग बॉस ओटीटी'च्या स्पर्धकांसोबत संवाद साधताना दिसत आहे. दरम्यान त्याच्या हातात सिगरेटदेखील दिसत आहे. 






सलमान खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर


सलमान खानला नेटकरी चांगलच ट्रोल करत आहेत. शूटिंगदरम्यान सिगरेट, लोकांना शिकवण देताना तू कसं वागतो आहेस, याच कारणाने सलमानचे डोळे लाल झाले होते तर.., अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे चाहत्यांनी मात्र सलमानला मदत केली आहे. तो फक्त सिगरेट ओढतोय गुन्हा नाही, अशा कमेंट्स करत चाहते सलमानचं समर्थन करत आहेत. 


'बिग बॉस ओटीटी 2' आधी सलमान खान 'टायगर 3'च्या (Tiger 3) सेटवर सिगरेट ओढताना दिसला होता. 'टायगर 3'च्या सेटवरील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


सलमानच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Salman Khan Upcoming Movies)


सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो कतरिना कैफसोबत झळकणार आहे. तसेच शाहरुखच्या 'जवान' (Jawan) या सिनेमात त्याची झलक दिसणार आहे. तसेच 'किक 2' हा त्याचा आगामी सिनेमा आहे. 


संबंधित बातम्या


Salman Khan : "सलमान खान आमचं टार्गेट"; गँगस्टर गोल्डी ब्रारने भाईजानला पुन्हा दिली जीवे मारण्याची धमकी