निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
'सुलतान'मध्ये सलमानचं चाहत्यांसाठी सरप्राईज
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2016 06:45 AM (IST)

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानची रंगत काही वेगळीच आहे. सलमानने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. सल्लूच्या फॅन्सना 'सुलतान'मध्ये त्याच्या आवाजातील 'जग घुमिया' या गाण्याचा आनंद लुटता येणार आहे. सलमान खानचा गाता गळा अनेक गाण्यातून आपल्यासमोर आला आहे. त्याचं हेच सिंगिंग टॅलेण्ट आता 'सुलतान' सिनेमात देखील पाहायला मिळणार आहे. हे केवळ एक प्रमोशनल साँग नसून ते या सिनेमाचा एक भाग असेल. विशाल-शेखर या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. सलमानने याआधी त्याचा होम प्रॉडक्शन चित्रपट 'हिरो' मध्ये 'मैं हूं हिरो तेरा' गाणे गायलं होते, जे प्रचंड हिट झालं होत. 'दबंग','वॉन्टेड' आणि 'किक' या ब्लॉकबस्टर चित्रपटातही गाणं गायलं होतं. आता सलमानचं 'जग घूमिया' हे नवी गाणं प्रेक्षकांवर किती आवडेल हे लवकरच कळेल. 'सुलतान' सिनेमात या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ‘ईद’ला रिलीज होणार आहे.