वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चं पोस्टर सलमानकडून रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2018 09:59 AM (IST)
सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली 'लव्हरात्री' या सिनेमाची निर्मिती होत आहे
मुंबई : 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या मुहूर्तावर सलमान खानने 'लव्हरात्री' चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवर रिलीज केलं आहे. या सिनेमातून सलमान मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे, तर अभिनेत्री वरिना हुसैन त्याच्यासोबत पदार्पण करत आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली 'लव्हरात्री' या सिनेमाची निर्मिती होत आहे. लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. 21 सप्टेंबर 2018 रोजी 'लव्हरात्री' प्रदर्शित होणार आहे. सलमानने गेल्या आठवड्यात एक ट्वीट करुन धमाल उडवून दिली. ‘मुझे लडकी मिल गयी’ या त्याच्या चार शब्दांच्या एका ट्वीटने सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. अखेर ही मुलगी लव्हरात्रीसाठी मिळालेली हिरोईन असल्याचं समोर आलं.