मुंबई: अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘रेस 3’ हा सिनेमा आज पदर्शित झाला. या सिनेमाचा पहिला शो पाहिलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया एबीपी न्यूजने जाणून घेतल्या.


या प्रतिक्रियांवरुन ‘रेस 3’ हा सिनेमा प्रेक्षकांना पसंत पडला नसल्याचं दिसतंय. अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

अनेक प्रेक्षकांनी हा सिनेमा म्हणजे वेळ आणि पैशाचा अपव्यय आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी केवळ या सिनेमाचा क्लायमॅक्स आवडल्याचं सांगितलं.

त्यामुळे सलमानचा हा सिनेमा पहिल्या दिवशी किती कमाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

सलमानच्या यापूर्वीच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमाही रेकॉर्डब्रेक कमाई करेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.

सलमानच्या मागील चार सिनेमांची पहिल्या दिवसाची कमाई

टायगर ज़िंदा है - 33.75 कोटी

ट्यूबलाईट - 20.75 कोटी

प्रेम रतन धन पायो - 40.35 कोटी

बजरंगी भाईजान - 34.40 कोटी

या सिनेमात  सलमान खानसोबत जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह, साकिब सलीम आणि फ्रेडी दारुवाला मुख्य भूमिकेत आहेत.

रेस लागण्यापूर्वीच सलमानच्या 'रेस 3' ला 190 कोटी 

सलमानच्या 'रेस 3'ने प्रदर्शनापूर्वीच 190 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. इरॉस इंटरनॅशनल कंपनीने सहनिर्माता सलमान खान आणि निर्माते रमेश तौरानी यांना ऑफर दिली.

चित्रपटाचे जागतिक वितरण हक्क (चीन वगळता) आणि गॅरंटी रक्कम म्हणून 160 कोटी रुपये इरॉसने मोजल्याची माहिती आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज, रिलायन्स एन्टरटेनमेंट, यश राज फिल्म्स आणि इरॉस इंटरनॅशल कंपनीमध्ये 'रेस 3' चे हक्क विकत घेण्यासाठी चढाओढ सुरु होती.

सलमानच्या 'टायगर जिंदा है'ने बॉक्स ऑफिसवर 339 कोटी रुपये कमावले होते. रेस 3 सुद्धा 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित बातम्या 

 'रेस 3' मधील सलमानने लिहिलेलं 'सेल्फिश' गाणं रिलीज