Salman Khan:  दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) धुमधडाक्यात साजरा केला जात आहे.

  अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma) हिच्या घरी काल गणपती बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी अर्पिता खानच्या घरी हजेरी लावली. नुकताच सलमान खाननं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे.


सलमानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान हा त्याची भाची म्हणजेच अर्पिता आणि आयुष शर्माची मुलगी आयतला  कडेवर घेऊन गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. सलमाननं या व्हिडीओला "गणपती बाप्पा मोरया" असं कॅप्शन दिलं आहे.


सलमाननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान आणि त्याची भाची हे दोघे मिळून बाप्पाची आरती करत आहेत. तसेच त्यांच्या आजूबाजूला असणारी लोकं  टाळ्या वाजवत आहेत. सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांनी देखील गणपती बाप्पाची आरती केली.


पाहा व्हिडीओ:






शमिता शेट्टी, युलिया वंतूर, वरुण धवन आणि नताशा दलाल या सेलिब्रिटींनी देखील  बाप्पाच्या दर्शनासाठी अर्पिताच्या घरी हजेरी लावली होती.   सलमानची दुसरी बहीण अलविरा अग्निहोत्री ही पती अतुल अग्निहोत्रीसोबत गणपतीच्या दर्शनाला उपस्थित होती. तसेच सोहेल खाननं देखील बाप्पाचं दर्शन घेतलं.


शिल्पा शेट्टी,राम चरण,अल्लू अर्जुन आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पाचे आगामन झाले आहे. शाहरुख खानने गणपतीचा फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2023) शुभेच्छा दिल्या.


सलमान आणि शाहरुखने उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.  मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.


सलमान खानचे चित्रपट


सलमान खान हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. सलमान खानचा काही दिवसांपूर्वी किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता तो लवकरच टायगर-3 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान च्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी बाप्पाचं आगमन; फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला,"भरपूर मोदक खाण्यासाठी..."