Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सलमान हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.  सलमान खानने नुकत्याच एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. यावेळी सलमाननं अनेक विषयांवर मतं मांडली. या पत्रकार परिषदेमध्ये सलमानला नव्या कलाकारांबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सलमाननं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 


सलमान खानला नव्या कलाकारांबद्दल विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, 'ते सर्व मेहनत करत आहेत. प्रत्येकजण खूप लक्ष केंद्रित करुन काम करत आहेत. पण आम्ही पाच जण इतक्या सहजासहजी माघार घेणार नाही. आता पाच जण कोण आहोत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर शाहरुख, आमिर, मी, अक्की (अक्षय कुमार) आणि अजय असे आहे. आम्ही लवकर रिटायर्ड होणार नाही. आमचे चित्रपटही चालतात आणि म्हणूनच आम्ही आमची फी वाढवतो.' सलमानच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. 






सलमान खानला एका पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या धमकीबाबत विचारण्यात आले होते. तुम्ही सगळ्या देशाचे भाईजान आहात, मग आता मिळणाऱ्या धमकीकडे कसे पाहता, असा प्रश्न यावेळी त्याला विचारण्यात आला. त्यावर सलमान खानने उत्तर देताना म्हटले की, मी सगळ्यांचा भाई नाही, काहींचा 'भाई' आहे..तर कोणाचा तरी 'जान' आहे.


सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'टायगर 3'मध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे.  'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सलमान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती प्रेक्षकांना देतो. इन्स्टाग्रामवर त्याला 59 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Salman Khan: सलमानच्या शर्टलेस फोटोवर चाहते फिदा; म्हणाले, '58 व्या वर्षी सिक्स पॅक्स...'