Bipasha-Karan Revealed Daughter Face:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चिमुकलीचं आगमन झाले. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवी (Devi) असं ठेवलं. बिपाशा आणि करण यांनी देवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोंमध्ये देवीचा चेहरा दिसत नव्हता. आता बिपाशानं देवीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पहिल्यांदाच देवीचा चेहरा बिपाशाच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे. 


बिपाशानं शेअर केला फोटो 


बिपाशानं बुधवारी (5 एप्रिल) रात्री देवीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये देवीच्या चेहऱ्यावर क्युट स्माइल दिसत आहे. बिपाशानं देवीच्या फोटोला कॅप्शन दिलं, 'हॅलो वर्ल्ड, माझं नाव देवी आहे.' बिपाशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी ही पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये दिसत आहे. या फ्रॉकवर 'डॅडीज प्रिंसेस' असं लिहिलेलं दिसत आहे. देवीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 
बिपाशानं शेअर केलेल्या देवीच्या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री दिया मिर्झानं, 'गॉड ब्लेस यू देवी' अशी कमेंट केली. तर मलायकानं, 'OMG' अशी कमेंट केली. तसेच अभिनेता अभिषेक बच्चन, सुझेन खान, आरती सिंह यांनी देखील बिपाशानं शेअर केलेल्या देवीच्या फोटोला कमेंट्स केल्या. 


पाहा फोटो: 






बिपाशा आणि करणची लव्ह स्टोरी 


बिपाशा आणि करणची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. आता लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा झाले. धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं  कुबूल है,  दिल मिल गए,  दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे. बिपाशा आणि करणच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bipasha Basu : आलिया-रणबीर पाठोपाठ बिपाशा-करणला कन्यारत्न; वयाच्या 43 व्या वर्षी दिला बाळाला जन्म