बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत सलमान-कतरिना एकत्र!
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2016 03:21 AM (IST)
मुंबई: काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांनी काल रात्री इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सलमान आणि कतरिनामध्ये बराचवेळ बातचीत झाल्याचंही समजतं आहे. बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमधील हे दोघंही कलाकार एकत्र आल्याचं पाहायलं मिळालं. या व्यतिरिक्त या इफ्तार पार्टीत गुलामनबी आझाद, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह काँग्रेसच्या नेते या इफ्तार पार्टीला हजर होते. दरवर्षी बाबा सिद्धिकी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. या इफ्तार पार्टीमध्ये राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. याचवेळी कतरिना आणि सलमान खान यांचीही तिथं भेट झाली. या पार्टीमध्ये दोघंही वेगवेगळे आले होते. मात्र, आतमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी बराच वेळ एकत्रही घालवला.