Birthday Special Salim Khan: बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते सलीम खान (Salim Khan) यांचा आज 87 वा वाढदविस आहे. 24 नोव्हेंबर 1935 रोजी इंदूर येथे सलीम खान यांचा जन्म झाला. अनेक हिट चित्रपटांचे लेखन केले. त्यांनी जंजीर (zanjeer) या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या हिट चित्रपटाचे पटकथा लेखन केले. सलीम हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. जाणून घेऊयात सलीन खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन (Helen) यांच्या लव्ह स्टोरीबाबत...


हेलन आणि सलीम खान यांची लव्ह स्टोरी 


हेलन यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केल्यानंतर त्यांना काही चित्रपटात काम केले पण त्यांना सतत चित्रपट मिळत नव्हते याच दरम्यान हेलन यांची भेट प्रसिद्ध चित्रपट लेखक सलीम खान यांच्याशी झाली. त्यानंतर हेलन आणि सलीम यांची मैत्री झाली. यी मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या दोघांच्या नात्याची चर्चा तेव्हा बॉलिवूडमध्ये सुरु होती. 


सलीम यांनी 1964 मध्ये  सुशीला चारक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.  सुशीला आणि सलीम यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. बॉलिवूडमध्ये हेलन आणि सलीन यांच्या नत्याबाबात चर्चा सुरु होती. त्यामुळे 1981 मध्ये कुटुंबाचा विरोध असूनही सलीम आणि हेलन यांनी लग्नगाठ बांधली.  






हिट चित्रपटांचे केले लेखन


1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बारात’या चित्रपटामधून सलीम यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका त्यांनी साकारली. त्यानंतर 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरहदी लुटेरा, तीसरी मंजिल आणि 1967 मध्ये रिलीज झालेल्या दीवाना चित्रपटात त्यांनी काम केलं. 1975 शोले या सुपरहिट चित्रपटाचे संवाद लेखन सलीम यांनी केले. तसेच  डॉन, दिल तेरा दीवाना,काला पत्थरशान, शान, दीवार या चित्रपटांचे लेखन देखील त्यांनी केले. इंसानियत के देवता, बिल्ला नम्बर 786 या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. 


वाचा इतर महत्वाच्या बतम्या: 


Exclusive : 'सलमानला चावलेल्या सापाला...'; सलीम खान यांची माहिती