सलमानचं 'बीईंग ह्युमन' बीएमसीला मदत करणार, शिवसेना नगरसेवकाशी चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2019 11:53 AM (IST)
बीएमसीला आरोग्य आणि शिक्षणविषयक कशी मदत करता येईल, याविषयी सलमान खानने शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्याशी चर्चा केली
फोटो सौजन्य : गेट्टी इमेजेस
मुंबई : सुपरस्टार सलमान खान याने शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये भेट घेतली. आपल्या 'बीईंग ह्युमन' या संस्थेची बीएमसीला कशी मदत होऊ शकते, याविषयी सलमानने चर्चा केली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीट अर्थात सीएसआरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्याची इच्छा सलमानने व्यक्त केली. सलमानने विचारलेल्या भाभा हॉस्पिटलच्या दुरुस्तीबाबत प्रश्नांना जाधव यांनी उत्तरं दिली. महापालिकेच्या हॉस्पिटलमधील स्वच्छता सुधारण्याबाबत काय योगदान देता येईल, याबाबत सलमानने विचारणा केली. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सलमानने आरे कॉलनीत स्वच्छतागृहं बसवली होती. VIDEO | भाजप-शिवसेना युती मुंबईतील सर्व जागा राखणार? मुंबईकरांना काय वाटतं? | महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बीईंग ह्युमनकडून इलेक्ट्रिक सायकल पुरवण्याबाबतही सलमान आणि जाधव यांची चर्चा झाली. सलमानच्या शंकांचं तूर्तास निरसन करण्यात आलं. पुढील आठवड्यापर्यंत बीएमसीला आरोग्य आणि शिक्षणविषयक कशी मदत करता येईल, याचा निर्णय होणार आहे. बीईंग ह्युमनच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीमधून विद्यार्थी आणि रुग्णांना मदत व्हावी, यासाठी सलमानशी संपर्क साधल्याचं यशवंत जाधव म्हणाले. त्यानंतर सलमानशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती जाधवांनी दिली.