नवी दिल्लीः माध्यमांना दोन आठवड्यांसाठी मसाला मिळेल, असं नेहमी काही तरी बोलायला पाहिजे का, मी काही नाही बोललो तर बोरिंग वाटतो आणि बोललो तर वाद उभा होतो, असा सवाल करत बॉलिवूड स्टार सलमान खानने आपल्या बलात्कार पीडितेच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
माझ्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. मी एक बोलतो आणि त्याला वेगळ्याच भाषेत प्रसिद्ध केलं जातं, अशा शब्दात सलमानने माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सलमानने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होत, त्यावेळी तो बोलत होता.
सुलतान सिनेमाच्या शुटींगवेळी बलात्कार पीडितेसारखं वाटत होतं. शुटींग करुन जेव्हा रिंगच्या बाहेर जायचो तेव्हा उठता देखील येत नव्हतं, असं विधान सलमानने केलं होतं. त्यानंतर सलमानवर सगळीकडून जोरदार टीका झाली होती. महिला आयोगाने देखील सलमानला नोटीस बजावली होती.