मुंबई : भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेल्या तणावपूर्ण वातावरणावर अभिनेता सलमान खानने वक्तव्य केलं आहे. जे युद्ध करण्याचे आदेश देतात, त्यांच्याच हातात बंदूक द्या, असं सलमान खान म्हणाला.


ट्यूबलाईट या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सलमानने युद्ध दोन्ही देशांसाठी चांगलं नसल्याचं म्हटलं. यावेळी सलमानचा भाऊ अभिनेता सोहेल खानही उपस्थित होता.

युद्धाचे आदेश देतात, त्यांच्या हातात बंदूक दिली पाहिजे. असं केलं तर त्यांचे हात-पाय थरथरायला लागतील आणि युद्धाऐवजी चर्चा सुरु होईल, असं सलमान म्हणाला.

सलमानचा ट्यूबलाईट सिनेमा 25 जूनला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 1962 च्या भारत-चीन लढाईवर आधारित असल्याचं बोललं जातं.