मुंबई: अखेर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान अभिनेत्री पूजा डडवालच्या मदतीला धावला आहे.

सलमानसोबत 'वीरगती' चित्रपटात झळलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीशी झुंज देत आहे. तिने आर्थिक मदतीसाठी सलमानकडे याचना केली होती. त्यानंतर आता सलमानने तिला मदतीचा हात दिला आहे.

सलमानची ‘बिईंग ह्यूमन’ ही संस्था पूजाचा उपचाराचा सर्व खर्च करणार आहे.

पूजा डडवाल टीबीने त्रस्त

पूजा डडवाल सध्या टीबी आणि फुफ्फुसाच्या आजाराशी लढत आहे. पूजाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की तिच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. गेल्या 15 दिवसांपासून ती मुंबईतील शिवडीमधल्या रुग्णालयात दाखल आहेत.



सहा महिन्यांपूर्वी पूजाला टीबीचं निदान झालं. आजारापणात पूजाला तिचा नवरा आणि कुटुंबियांनीही वाऱ्यावर सोडलं आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

आर्थिक मदतीसाठी पूजाने आपला व्हिडिओ तयार केला होता. तो पाहून सलमान संपर्क करेल, असा विश्वास तिला होता.

गेली काही वर्ष पूजा गोव्यात कॅसिनो मॅनेजमेंट करत होती. मात्र आपल्याकडे एकही पैसा नसल्याचा दावा तिने केला आहे. चहा पिण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागत असल्याचं पूजा सांगते. पूजाने हिंदुस्तान, इंतकाम, सिंदूर की सौगंध यासारख्या चित्रपटातही काम केलं आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री पूजा डडवाल टीबीग्रस्त, सलमानकडे मदतीची याचना