सलमान-अनुष्काचे ठुमके, 'सुलतान'मधील 440 व्हॉल्ट्स रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2016 04:59 PM (IST)
मुंबई : 'बेबी को बास पसंद है' गाण्यातून चाहत्यांना ठेका धरायला लावल्यानंतर आणि 'जग घुमेया'मधून मन हेलावून टाकल्यानंतर सलमानच्या आगामी सुलतान चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. 440 व्हॉल्ट्स या पेपी साँगमध्ये सलमानसह अनुष्का ठुमके लगावताना दिसत आहेत. 440 व्हॉल्ट्स गाण्यात सुलतान अली म्हणजेच सलमान, आर्फा अर्थात अनुष्काचं मन जिंकण्याचे प्रयत्न करत आहे. सलमानच्या सिग्नेचर डान्स स्टेप्समुळे चाहते फिदा आहेत. चमचमतं जॅकेट आणि धोतर अशा अनोख्या स्टाईलमध्ये सल्लूमियानेही फॅन्सना खुश केलं आहे. मिका सिंगच्या आवाजात हे गाणं ऐकायला मिळणार आहे. गीतकार इर्षाद कमिलच्या शब्दांना विशाल-शेखरने संगीतबद्ध केलं आहे. सलमानने ट्विटरवरुन हे गाणं शेअर केलं आहे. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/BeingSalmanKhan/status/742613679644938241