सलमान उतरणार नव्या व्यवसायात, अर्पिताची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 06:30 PM (IST)
मुंबईः बॉलिवूड स्टार सलमान खान आता ज्वेलरीच्या व्यवसायात उतरणार आहे. लवकरच सलमान बेईंग ह्यूमन अंतर्गत ज्वेलरीचा ब्रँड लाँच करणार आहे, अशी माहिती सलमानची बहीण अर्पिता खानने दिली. बॉलिवूड स्टार आता लवकरच एका नवीन व्यवसायात उतरत आहे. याबाबत आता सलमानची बहीण अर्पिता खान शर्मानेही माहिती दिली आहे. सप्टेंबरमध्ये सलमान हा ब्रँड लाँच करणार आहे. बेईंग ह्यूमन सलमान नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीसाठी ओळखला जातो. हा ब्रँड देखील त्याचाच एक भाग असणार आहे. ही ज्वेलरी सामान्य व्यक्तींना परवडेल, अशा किंमतीत असेल, अशी माहितीही अर्पिताने दिली.